Menu Close

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करा : राष्ट्रप्रेमी हिंदूंची मागणी

निवेदन स्वीकारतांना (डावीकडे) वर्धा येथील निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर
गडचिरोली येथे निवेदन स्वीकारतांना (उजवीकडे) अपर जिल्हाधिकारी श्री. सुधाकर कुळमेथे
चंद्रपूर येथे निवेदन स्वीकारतांना (मध्यभागी) जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक तेजस्विनी पाटील

वर्धा : लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तसेच दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अवैधपणे काश्मिरमध्ये वसवण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हितेश निखार आणि श्रीराम मंदिराचे सदस्य श्री. संजीव हरदास यांनी केली. २८ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.

या वेळी समितीचे अन्य कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक अन् धर्माभिमानी श्री. विलास डफळे उपस्थित होते. वर्धा येथील निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, तसेच चंद्रपूर, राजुरा आणि गडचिरोली येथे यासंदर्भात निवेदनही देण्यात आले.

आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या

१. काश्मीरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांची सरकारने पुनर्स्थापना करावी आणि गेल्या ७० वर्षांत जम्मू-काश्मीर विधानसभेने केलेले देशविरोधी कायदे रहित करावेत.

२. कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याने शासनाने तिची निर्मिती, वितरण आणि विक्री होणार नाही, अशा सक्त सूचना राज्यशासन अन् जिल्हा प्रशासन यांना द्याव्यात. तसेच शाडू मातीच्या आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा.

क्षणचित्र : आंदोलनाच्या वेळी १५५ धर्माभिमान्यांनी स्वाक्षरी करून आंदोलनाला समर्थन दर्शवले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *