पंतप्रधान मोदी यांचा बेल्जियम दौरा
ब्रुसेल्स : कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही. आतंकवादाला धर्माशी जोडू नका, आतंकवाद संपूर्ण मानवजातीसाठी धोका असून ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्रितपणे याविरोधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे केले. (आतंकवादी स्वतः धर्मासाठी जिहाद करत आहोत, असे सांगतात, तसेच स्वतःच्या संघटनेचे नाव धर्माच्या आधारे ठेवतात. अशा वेळी आतंकवाद आणि आतंकवादी यांसह संबंधित धर्माविषयीची चर्चा लोक करू लागतात. ते कसे टाळणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ते भारतीय समुदायाला संबोधित करत होते.
मोदींनी या वेळी आतंकवादावरून संयुक्त राष्ट्रावर टीका केली. मागच्या आठवड्यात ब्रुसेल्समध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, संयुक्त राष्ट्राला आतंकवाद समजलेला नाही. आतंकवादामुळे आज संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला आहे. आतंकवादाला आसरा आणि पाठिंबा देणार्यांंवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. (भारतातही अशा प्रकारची कारवाई व्हावी, अशीच जनतेची इच्छा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) भारत मागच्या ४० वर्षांपासून आतंकवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला आतंकवादाचा धक्का दिला, तोपर्यंत जागतिक महासत्तांना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती; पण भारत आतंकवादासमोर वाकला नाही आणि वाकणारही नाही. (आतंकवादाच्या समोर वाकता कामा नये, हे ठीकच आहे, तरीही मागील ४० वर्षांत जिहादी आतंकवादामुळे झालेली हानी मोठीच आहे, हे विसरता येत नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात