Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या धर्मकार्यासाठी शुभाशीर्वाद : जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी

प.पू. सिंहासनाधीश्‍वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी (डावीकडे) यांची भेट घेतांना श्री. नीलेश जोशी

पुणे : हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. समितीच्या धर्मकार्यासाठी शुभाशीर्वाद !, असे आशीर्वचनपर उद्गार प.पू. सिंहासनाधीश्‍वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी काढले. श्रावणमास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती यांच्या वतीने १ ते ३० ऑगस्ट या कालावधीत मोरया मंगल कार्यालय येथे २९ वे तपोनुष्ठान चालू आहे. यासाठी विविध राज्यांतील अनेक शिवाचार्य महाराज आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होत आहेत. त्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री नीलेश जोशी, जयहिंद सुतार, मिलिंद जोशी यांनी महाराजांची भेट घेतली आणि पुष्पहार, शाल, श्रीफळ अन् समितीने प्रकाशित केलेला लव्ह जिहाद हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *