Menu Close

सावरवाडी (ता. राधानगरी) : गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार

सावरवाडी येथे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीसाठी उपस्थित कार्यकर्ते

सावरवाडी (तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) : येथे झालेल्या श्री गणेशोत्सव मंडळांच्या प्रबोधनानंतर कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा? याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमोल कुलकर्णी आणि सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी तीन गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष

मंडळातील बहुतांश कार्यकर्त्यांच्या घरी गणेशोत्सवाची सिद्धता चालू असतांना मंडळातील कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित होते.  मंडळातील कार्यकर्त्यांनी श्री गणेशाच्या नामपट्ट्या  कार्यकर्त्यांना वितरित केल्या.

अन्य ठिकाणी झालेली प्रवचने

१. शिंदेवाडी येथील कला-क्रीडा सांस्कृतिक मंडळात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज यांनी प्रबोधन केले. मंडळातील कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनच करणार, असे सांगितले.

२. हणमंतवाडी या गावात धर्मप्रेमींच्या घरी प्रवचन घेण्यात आले. उपस्थित धर्मप्रेमींनी उपयुक्त माहिती मिळाल्याचे सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *