- लंडनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाक समर्थक एकत्र येतात आणि भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर आक्रमण करतात, हे जगात गौरवण्यात आलेल्या ब्रिटीश पोलिसांना लज्जास्पद !
- ब्रिटन हे पाकसमर्थकांचे माहेरघर झाले आहे, हेच या घटनेतून दिसून येते. ब्रिटन हे पहिल्यापासून भारताचा दुःस्वास करत आहे. त्यामुळे त्या देशात त्याने पाकसमर्थकांना आश्रय दिल्यास आश्चर्य ते काय ?
- आता याला प्रत्युत्तर देण्यास लंडनमधील भारतीय समर्थकांनी पाकच्या उच्चायुक्त कार्यालयावर आक्रमण केल्यास पाक भारतावर हिंसाचाराचे आरोप करील !
लंडन : जम्मू-काश्मीरला लागू करण्यात आलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तान सातत्याने भारताच्या विरोधात कारवाया करत आहे. आता ४ सप्टेंबरला लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर १० सहस्र पाकिस्तानी समर्थकांनी निदर्शने करत आक्रमण केले. त्यांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाच्या इमारतीवर अंड्यांचा मारा केला आणि दगडफेक केली. यामुळे इमारतीच्या काचा फुटल्या. भारताने याविषयी लंडनच्या महापौरांकडे तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (लंडनचे महापौर सादिक खान हे पाक वंशाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पाकसमर्थकांवर कारवाई होईल, अशी आशाच नको ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याआधीही १५ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करून भारताच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केला होता.
निदर्शने करणार्या पाक समर्थकांनी याला ‘काश्मीर फ्रीडम मार्च’ असे नाव दिले होते. येथील पार्लमेंट स्क्वेअरपासून भारतीय उच्चायुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. याचे नेतृत्व ब्रिटनमधील लेबर पार्टीच्या काही खासदारांनी केले. पाकिस्तानी समर्थक मोठ्या संख्येने या मोच्यार्र्मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या हातात पाकव्याप्त काश्मीरचे झेंडे होते.
पाकने भारताकडून जीवनावश्यक औषधे मागवली !
कलम ३७० हटवल्यावर पाकने भारतासमवेतचे व्यापारी संबंध तोडले होते; मात्र त्यामुळे पाकमध्ये जीवनावश्यक औषधांचा तुटवडा पडू लागल्यावर पाकने व्यापारावरील बंदी अंशतः उठवली आहे. पाकिस्तानने भारतातून जीवनावश्यक औषधांची आयात करण्याला संमती दिली आहे. (ज्या देशातील औषधांमुळे जनतेचे प्राण वाचवता येतात, त्या देशाच्या म्हणजे भारताच्या विरोधात अणूयुद्ध करण्याच्या घोषणा देणार्या पाकची खरी स्थिती लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात