नागपूर : येथील धर्मप्रेमी श्री. रवींद्र भोंदेकर यांच्या आईच्या निधनानंतरच्या चौदाव्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या लोकांना धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला यांनी उपस्थितांना श्राद्ध, पिंडदानाचे महत्त्व, ते केल्याने होणारे लाभ, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व, कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व यांविषयी माहिती दिली. उपस्थितांनी या वेळी उत्स्फूर्तपणे शंकांचे निरसन करून घेतले. साधनेला आरंभ करण्याची सिद्धताही दर्शवली. काही जणांनी धर्मशिक्षणानुसार श्राद्ध आणि पिंडदान करण्याचे ठरवले. या कार्यक्रमाचा अनुमाने १५० जणांनी लाभ घेतला.
क्षणचित्र
श्री भोंदेकर यांनी उपस्थितांना सनातन संस्थेचे ‘श्री दत्त’ या विषयावरील लघुग्रंथ आणि नामपट्टी देण्याचे नियोजन केले होते.