भारतात असे विधान एखाद्या लोकप्रतिनिधीने अथवा मंत्र्याने केले असते, तर त्याला त्याच्या पदाचे त्यागपत्रच द्यावे लागले असते !
लंडन : बुरखा घालणार्या महिला एखाद्या बँकेवर दरोडा घालण्यासाठी निघालेल्या दरोडेखोरांप्रमाणे किंवा टपालपेटीप्रमाणे दिसतात, असे विधान ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले. त्यानंतर त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. तसेच विरोधी पक्षांच्या खासदारांनीही यावर टीका केली आहे. जॉन्सन यांनी क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या टीकेविषयी जॉन्सन संसदेत म्हणाले की, मी अभिमानाने सांगू इच्छितो की, माझे मंत्रीमंडळ आतापर्यंतच्या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वाधिक विविधता असणारे मंत्रीमंडळ आहे. मी आणि माझे मंत्रीमंडळ आधुनिक ब्रिटनचे प्रतिनिधित्व करते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात