Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे ‘सामूहिक रामनामजप अभियान’ : देहली आणि नोएडा येथे भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देहली येथील हनुमान मंदिरमध्ये सामूहिक नामजप करतांना सौ. क्षमा गुप्ता आणि भाविक

देहली : भारतात लवकरात लवकर रामराज्य यावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथील न्यू अशोकनगर, सी ब्लॉकमधील हनुमान मंदिर, न्यू कोंडलीमधील पुराण शिवमंदिर, मालवीयनगरमधील शिवमंदिर आणि उत्तरप्रदेशातील नोएडा येथील खोरा कॉलनी येथे ‘सामूहिक रामनामजप अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या अभियानाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये समितीचे श्री. अरविंद गुप्ता आणि कु. किरण महतो, सौ. क्षमा गुप्ता, सौ. ममता गुप्ता, कु. अक्षिता गुप्ता, सौ. संगीता गुप्ता आणि धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला.

क्षणचित्रे

१. नोएडा येथील खोरा कॉलनीमध्ये धर्मशिक्षणवर्ग संपल्यावर सामूहिक नामजप करण्यात आला. यात अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले.

२. देहली येथील हनुमान मंदिरामध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप चालू असतांना उपस्थितांना वातावरणात शांती आणि शक्ती जाणवली.

३. न्यू कोंडलीमधील पुराण शिवमंदिरातील सामूहिक नामजपामध्ये ६५ हून अधिक भाविक सहभागी झाले.

४. मालवीयनगर येथील शिवमंदिरामध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने प्रवचन घेण्यात आले. त्यानंतर सामूहिक रामनामजप करण्यात आला. यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *