Menu Close

भारतमाता की जय न म्हणणार्‍यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद : खासदार योगी आदित्यनाथ, भाजप

जोधपूर : जे लोक भारतमाता की जय म्हणत नाहीत, त्यांची राष्ट्रभक्ती संशयास्पद आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी जैसलमेर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले.

योगी आदित्यनाथ म्हणाले,

१. कोणताही राजकीय पक्ष राष्ट्रपिता घोषित करू शकत नाही. राष्ट्रपिता घोषित करायचे असेल, तर भगवान शिवाला करा, असेही खासदार योगी म्हणाले.

२. गोहत्या प्रश्‍नाकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. देशात गोहत्येवर कायद्याने त्वरित प्रतिबंध घातला पाहिजे.

३. अयोध्येत लवकरात लवकर तोडगा निघून तेथे राममंदिर बनावे, असा आमचा प्रयत्न राहील.

४. परकियांच्या उष्ट्यावर जगणार्‍यांना या देशात विकास करणारे शासन आले, हेच पचले नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी असहिष्णुतेच्या नावावर भारताची मानहानी करणारे हे लोक तोंडावर आपटतील.

५. महर्षि अरविंद यानी ५०-६० वर्षांपूर्वी लिहून ठेवल्याप्रमाणे पाक जसे कर्म, तसे फळ या न्यायाप्रमाणे त्याच्या कर्माचे फळ भोगत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *