पंटागणे, सभागृहमालक किंवा शाळा यांनीही हिंदूंचे धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांच्या अशा सभांना अनुमती देऊ नये !
मुंबई : वरळी येथील महापालिकेच्या शाळेमध्ये न्यू लाईफ फेलोशिप मिशनच्या वतीने विनाअनुमती चालू असलेल्या ख्रिस्ती प्रार्थनासभेच्या विरोधात लीगल राईट्स ऑब्झर्व्हरीने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
१. या सभेत संमोहनासारख्या माध्यमाच्या आधारे अंधश्रद्धा पसरवण्याचा आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला होता.
२. अशा प्रकारच्या प्रार्थनासभांचे आयोजन विविध ख्रिस्ती मिशनर्यांच्या माध्यमातून अनेकदा करण्यात येते. धर्मांतराच्या हेतूने अशा सभा आयोजित केल्या जातात. वरळी येथे चालू असलेल्या सभेची माहिती मिळताच बजरंग दलाच्या काही सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन सभेवर आक्षेप घेतला.
३. तक्रारीनंतर स्थानिक पोलिसांनी आयोजकांना अनुमती न घेता प्रार्थना सभेचे आयोजन केल्याविषयी समज दिली; मात्र या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई न्यू लाईफ फेलोशिप मिशनमधील आयोजकांवर करण्यात आली नाही. (अन्य धर्मियांना झुकते माप देणारे पोलीस वैध मार्गाने कार्य करणार्या हिंदूंना मात्र धारेवर धरतात. पोलिसांचा हा दुटप्पीपणा नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. या घटनाक्रमाची राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही नोंद घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा प्रियांका कानूनगो यांनी या संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना अधिकृत पत्र लिहून ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महापालिकेच्या शाळांचा वापर केला जाऊ शकतो का ?, अशा कार्यक्रमांना शिक्षण विभाग अनुमती देऊ शकतो का ?, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात