अशी बंदी प्रशासन घालू शकते, तर नेटफ्लिक्सवरील मालिकांमधून भारत आणि हिंदु धर्म यांचा अवमान होत असतांना त्याच्यावर बंदी का घालण्यात येत नाही ?
नवी देहली : ‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणारी हिंदी मालिका ‘राम सिया के लव-कुश’ला पंजाबमधील वाल्मीकि समाजाने विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने पंजाबमधील काही भागांत याच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. या मालिकेतून ऋषि वाल्मीकि यांच्याविषयी चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत वाल्मीकि समाजाने ७ सप्टेंबरला पंजाब बंदचे आयोजन केले होते. समाजाने कलर्स वाहिनीवर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात