रामनाथ (अलिबाग) : आमची मागणी आहे की, भारताच्या संविधानामध्ये पालट करा आणि देशाला हिंदु राष्ट्र घोषित करा. हिंदूंना अभिप्रेत असे कायदे बनवा की, मुलायम सिंगलासुद्धा उद्या निवडणूक जिंकून प्रधानमंत्री पदाची शपथ घ्यायची असेल, तर जोपर्यंत ते अयोध्येमध्ये जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेणार नाही तोपर्यंत त्यांना शपथ घेता येणार नाही, असा घणाघात विश्व हिंदु परिषदेचे डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे केला. रामनाथ येथील जयमाला गार्डन्समध्ये विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने डॉ. प्रवीण तोगाडिया यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले की,
१. आज हिंदुस्थानात हिंदु सुरक्षित नाहीत. दिवसाढवळ्या देशाच्या राजधानीत मुसलमानांनी डॉ. नारंग या ४० वर्षीय डॉक्टरची हत्या केली आणि हिंदूंनी त्याला विरोध केला नाही.
२. हिंदु घाबरला आहे का कि हिंदु झोपेचे सोंग घेऊन बसला आहे ? असे होण्याचे मुख्य कारण त्याला योग्य नेतृत्व नाही. जेव्हा हिंदूंना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचे नेतृत्व मिळाले तेव्हा ते लढत लढत अफगाणिस्थानापर्यंत पोहोचले आणि पराक्रम गाजवला. जेव्हा हिंदूंना महाराणा प्रताप यांचे नेतृत्व मिळाले तेव्हा त्यांनी मोघलांच्या ८० पेक्षा अधिक छावण्या नष्ट केल्या,
३. आज स्थिती एवढी बिकट आहे की देशातील ९५ लक्ष मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यासाठी कर रूपाने पैसे हिंदु देतात.
४. सन १०७५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे राज्य होते. एकही व्यक्ती मुसलमान नव्हती, सगळे हिंदू होते; पण आज सगळे मुसलमान आहेत आणि एकही हिंदु शिल्लक नाही. कारण आता अफगाणिस्तानमध्ये राजसत्ता मुसलमानांच्या हाती गेली.
५. १०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्यांक होते. एकाही मंदिरावर आक्रमण झाले नाही, एकाही हिंदूला साधी चापटसुद्धा मारली गेली नाही, एकही गाय कापली जात नव्हती; याचे कारण तेथे हिंदु राजा हरिसिंग यांंच्या हाती सत्ता होती. त्यांच्यानंतर अब्दुल्लाच्या हाती सत्ता आली आणि काश्मीरमध्ये हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. म्हणून हिंदूंनी सुरक्षित जीवन जगायचे असेल, तर राजसत्ता आपल्या नियंत्रणात ठेवायला हवी.
कार्यक्रमाला श्री. रघुजी आंग्रे (कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज), अधिवक्ता दीपक गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनात प्रखंड मंत्री श्री. श्रीराम ठोसर, संघटनमंत्री श्री. सुरेश गोखले, श्री. चेतन पटेल, तालुका अध्यक्ष अलिबाग, श्री अनिल चोपडा, अधिवक्ता श्री. चेउलकर, डॉ. निशिगंधा आठवले आणि श्री. सुनील दामले हे सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात