-
काश्मीरविषयी एकतर्फी आणि भेदभावपूर्ण बातम्या छापल्याचा विरोध
-
फुटीरतावादी आणि खलिस्तानी यांच्याकडून ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या समर्थनार्थ मूक निदर्शने
अमेरिकेतील प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष सर्वज्ञात आहे. त्यामुळे काश्मीरला लागू केलेले ३७० कलम हटवल्यावर ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे. अशा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर भारतबंदीच हवी !
वॉशिंग्टन : काश्मिरी हिंदूंनी येथील दैनिक ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. कलम ३७० हटवल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी एकतर्फी आणि भेदभाव करणार्या बातम्या प्रसारित केल्यावरून ही निदर्शने करण्यात आली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेने या निदर्शनांचे आयोजन केले होते. यानंतर त्यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला एक निवेदन दिले. या दैनिकाने मात्र त्यांनी छापलेल्या बातम्या ‘निष्पक्ष, मार्मिक आणि व्यापक होत्या’, असे म्हटले आहे. याच वेळी अमेरिकेतील पाकिस्तानी नागरिक, काश्मीरमधील फुटीरतावादी आणि खलिस्तानवादी हे या दैनिकाच्या समर्थनार्थ मूक निदर्शने करत होते. (पाक विदेशातही भारत विरोधी कारवाया करतो, याचे हे द्योतक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेचे सदस्य आणि निदर्शनांचे आयोजक म्हणाले की, या दैनिकाच्या बातम्यांमध्ये कुठेही काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची, त्यांच्या नरसंहाराची माहिती नाही. त्यांना झालेल्या विस्थापनाचीही माहिती या दैनिकाने दिली नाही. (यावरून ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ एकतर्फी वृत्तांकन करते, हे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात