‘तेहलका’च्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’चे प्रकरण
- गोवा सरकार श्री. मुतालिक यांच्यावर घालण्यात आलेली बंदी कधी उठवणार ? ती त्वरित उठवावी, अशी हिंदूंची अपेक्षा !
- हिंदुत्वनिष्ठांवर चिखलफेक करण्याची ‘तेहलका’ची ही काही पहिलीच वेळ नव्हे. अशा प्रकारे खोटे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून हिंदूंच्या संघटना आणि त्यांचे प्रमुख यांची अपकीर्ती करणार्या संबंधितांना कारागृहात टाकले पाहिजे !
हुब्बळ्ळी (कर्नाटक) : ‘तेहलका’ वृत्तसंस्थेने कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ करून श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक हे पैसे घेऊन दंगल घडवून आणत असल्याचा आरोप केला होता. येथील जिल्हा न्यायालयाने श्री. मुतालिक यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
१. ‘तेहलका’ने वर्ष २०१० मध्ये केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये ‘श्री. प्रमोद मुतालिक पैसे घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणात दंगल घडवून आणत आहेत’, असा आरोप केला होता. त्यास विरोध करून श्रीराम सेनेने ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये सहभागी असलेले पुष्प कुमार यांच्यासह वृत्तसंस्थेचे राहुल कंवल, नकवी आदींच्या विरोधात खटला प्रविष्ट केला होता.
२. श्री. प्रमोद मुतालिक न्यायालयात म्हणाले, ‘‘लव्ह जिहादच्या संदर्भात पुष्प कुमार यांनी २५ फेब्रुवारीला मला बोलावले होते. या संदर्भात आम्ही दोघे २७ फेब्रुवारीला भेटलो. या वेळी आमच्या दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले होते; परंतु ध्वनीमुद्रणात स्वतःला हवा तसा पालट करून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले. हिंदू संघटनेच्या प्रमुखांची नाचक्की व्हावी या दुष्ट हेतूने असे करण्यात आले.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात