कराची : पाकिस्तानच्या कराची शहरातील सोल्जर बाजार येथील प्रसिद्ध श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या खोदकामाच्या वेळी हिंदु देवतांच्या १५ अमूल्य प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. पाकिस्तानातील एका वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या मूर्ती पिवळ्या दगडापासून बनवल्या असून त्यांवर शेंदूर लावल्याच्या खुणा दिसत आहेत. यामूर्तींमध्ये महावीर हनुमान, श्रीगणेश महाराज आणि नंदी महावीर यांच्या मूर्ती आहेत. तसेच आतमध्ये एक हवनकुंड, अस्थिकलश आणि इतर साहित्य सापडले आहे. या मूर्ती आणि इतर वस्तू सुमारे १ सहस्र ५०० वर्षे जुन्या असल्याचा अंदाज मंदिर व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी मंदिर व्यवस्थापनाने सरकारकडे केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात