Menu Close

तेलंगणमध्ये धर्मांधांकडून आंबेडकर तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडपाची तोडफोड

  • मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या तेलंगणच्या ‘तेलंगण राष्ट्र समिती’ सरकारच्या राज्यात अशा घटना घडल्यास आश्‍चर्य ते काय ?
  • गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस !

वारंगळ (तेलंगण) : येथील एल्.बी. नगरमधील गणेशोत्सव मंडपात दलित महिला पूजा करत असतांना ६० धर्मांधांच्या जमावाने त्यांच्यावर आक्रमण केले आणि मंडपाची तोडफोड केली. या आक्रमणात एक महिला आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी नरेंद्र हे गंभीर घायाळ झाले. या गणेश मंडळाचे आयोजक आंबेडकर तरुण मंडळ आहे. ‘धर्मांधांनी जाणीवपूर्वक आक्रमण करून आमच्या धार्मिक अधिकारांवर अतिक्रमण केले’, असे या मंडळाने म्हटले आहे.

धर्मांधांनी केलेले आक्रमण पूर्वनियोजित असून त्यामागे धर्म सलोखा भंग करण्याचा उद्देश होता. याविषयी पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनीही गुन्हा न नोंदवता तक्रार मागे घेण्यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांवरच दबाव आणला, असे आयोजकांनी म्हटले आहे. (अशा पोलिसांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *