Menu Close

आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !

अक्क्रा (घाना) : भारतात ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे. येथे शास्त्रोक्त पद्धतीने पूजा, आरती, नैवेद्य, भजन, कीर्तन करण्यासह मूर्तीचे विसर्जनही वहात्या पाण्यात केले जाते. (भारतातील बुद्धिप्रमाण्यवाद्यांना चपराक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथे ३ दिवसच हा उत्सव साजरा केला जातो. येथे अनुमाने १२ सहस्र हिंदू रहातात. वर्ष १९७० पासून ते विविध उत्सव साजरे करत आहेत. श्री गणेशाची उपासना करण्यासह भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव यांचीही उपासना केली जाते. यांची श्रद्धा आहे की, प्रत्येकाला देवावर श्रद्धा ठेवायला हवी. तो सर्वांच्या समस्या दूर करतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *