हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची स्तुत्य कृती
मोई (जिल्हा पुणे) : इंद्रायणी नदीमध्ये ७ सप्टेंबरला पारंपरिक पद्धतीने भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते; पण नदीचे पाणी ओसरल्यावर अनेक श्री गणेशमूर्ती नदीकाठाला आल्या. त्यांतील काही मूर्तींचे अवयव भंग पावले होते. गावात धर्मशिक्षणवर्ग घेण्यास आलेले हिंदु जनजागृती समितीचे श्री. अशोक कुलकर्णी आणि श्री. जयहिंद सुतार यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तेथील स्थानिक युवकांचे साहाय्य घेऊन त्या श्री गणेशमूर्ती पुन्हा खोलवर पाण्यात विधीवत् विसर्जित केल्या. ‘अनंतचतुर्दशीनंतर अशा प्रकारे श्री गणेशमूर्ती दिसल्यास आम्हीही त्या पुन्हा नदीत विसर्जित करतो. धरणे तुडुंब भरलेली असतांना प्रशासनाने विसर्जन दिवसाच्या व्यतिरिक्त आधी आणि नंतर असे २ दिवस पाणी सोडायला हवे, जेणेकरून असा प्रकार होणार नाही’, अशा भावना स्थानिक युवकांनी व्यक्त केल्या.