Menu Close

मुंबई : अमजदअली खान व नूर मोहम्मद नजीर शेख ने केला तरुणीवर बलात्कार

मुंबई : विवस्त्रावस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, २ धर्मांधांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच गोवंडीत घडला आहे. अत्याचार करणाऱ्या दोघांना ट्रॉम्बे पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. अमजदअली मोहम्मदजमा खान (वय ३०) व नूर मोहम्मद नजीर शेख (४२, दोघे रा. म्हाडा कॉलनी, गोवंडी) अशी आरोपींची नावे आहेत.

खान हा पेंटर तर शेख वाहन चालकाचे काम करतो. परिसरात राहत असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून खानने तिच्याशी जवळीक निर्माण केली होती. तिचे विवस्त्रावस्थेतील फोटो त्याने मागवून घेतले होते. त्यानंतर, तो तिला ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. खान ने पिडित युवतीला ६ सप्टेंबरला मानखुर्द, महाराष्ट्रनगरातील शांती को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील रूम नं. ११५ मध्ये बोलाविले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास खान व त्याचा मित्र शेखने तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत पिडित युवतीने शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीसांनी आरोपींना कह्यात घेतले.

स्त्रोत : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *