-
हिंदुत्वनिष्ठ द्वैपायन वरखेडकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी
-
हिंदु मंदिरातील दानाचा ख्रिस्त्यांसाठी वापर होत असल्याचाही आरोप !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : तिरूपती येथील बालाजीचे मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात प्रतिदिन सहस्रो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानची आणि दर्शनासाठी येणार्या भाविकांची व्यवस्था करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने एक समिती स्थापन केली आहे; परंतु या समितीचे अध्यक्ष ख्रिस्ती आहेत आणि देवस्थानच्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणात जमा होणारे अर्पण ते त्यांच्या ख्रिस्ती धर्मासाठी वापरत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी हिंदु धर्मीय व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारला सूचना करावी, अशी मागणी श्री. द्वैपायन वरखेडकर यांनी राष्ट्रपतींकडे एका अर्जाद्वारे केली आहे.
श्री. वरखेडकर या अर्जात पुढे म्हटले आहे की,
१. आंध्रप्रदेश सरकारने नियुक्त केलेले देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ख्रिस्ती असल्याने त्यांना हिंदु धर्म आणि देवस्थान यांच्याप्रती काहीही श्रद्धा नाही.
२. बालाजी देवस्थानामध्ये काम करण्यासाठी ख्रिस्ती कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. ते कर्मचारी श्रद्धापूर्वक काम करत नसून तिरुपती येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसारही केला जात आहे. हे सर्व अत्यंत अयोग्य आहे.
३. कोणत्याही धर्माच्या देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी अन्य धर्मियांची नियुक्ती करणे अयोग्य आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्याचा विरोध केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
एक बार आईना ज़रा ग़ौर से देख लेना। शक़ और ग़लतफ़हमी दोनों दूर हो जायेंगे!