बेळगाव : ८ सप्टेंबर या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील मोहिशेत गावात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी रामनाम संकिर्तन अभियानाच्या निमित्ताने नामदिंडी घेण्यात आली. याचा प्रारंभ गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासमोरून करण्यात आला. या दिंडीमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, धर्मप्रेमी, तरुण युवक, वारकरी भजनी मंडळ आणि महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. गावाच्या मध्यवर्ती भागात भजन, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात गावकरी महिलांनी पारंपरिक फुगड्या घातल्या. यात ७० हून अधिक भाविक सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्वला गावडे यांनी मार्गदर्शन केले.
विशेष
मोहिशेत गावात गेले १५ दिवस सातत्याने पाऊस चालू होता. दिवसभरात १० मिनिटेही पाऊस थांबत नव्हता. नामदिंडीच्या दिवशी सकाळपासून दिंडीची सांगता होईपर्यंत पाऊस पडला नाही.