मिरवणुकीत धारदार शस्त्रे मिरवण्यात आली !
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयामध्ये रामनवमीची मिरवणूक जाऊ शकते का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ?
वाराणसी (उत्तरप्रदेश) : येथील बनारस हिंदु विश्वविद्यालयामध्ये १० सप्टेंबर या दिवशी मोहरमच्या ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. यात धारदार शस्त्रेही मिरवण्यात आली. विश्वविद्यालयाच्या सुरक्षारक्षकांनी हे पाहूनही त्याविरोधात कोणतीही कृती केली नाही. याचा विरोध म्हणून धर्माभिमानी हिंदु विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. या घटनेसाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला उत्तरदायी ठरवले. विद्यार्थ्यांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी प्रशासकीय अधिकार्यांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर आंदोलन थांबवण्यात आले.
विश्वविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. ओ.पी. राय म्हणाले की, अनेक वर्षांपासून मोहरमची मिरवणूक विश्वविद्यालयामध्ये येत आहे; मात्र आता याला वादाचे सूत्र बनवले जात आहे. हे अयोग्य आहे. (असे आहे, तर इतकी वर्षे विश्वविद्यालयामध्ये मोहरमची मिरवणूक काढण्याची अनुमती का देण्यात आली ?, याचेही उत्तर प्रा. राय यांनी देणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात