- तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता सत्तेत असतांना शंकराचार्यांना अटक झाली होती. त्याच अण्णाद्रमुक पक्षाचे सरकार सत्तेत असतांना मंदिरांची कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेल्या भूमीवर अतिक्रमण होत असेल, तर आश्चर्य ते काय ?
- तमिळनाडूमध्येच नव्हे, तर देशातील प्रत्येक राज्यात मंदिरांच्या सहस्रो एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. याला भ्रष्ट राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि स्वार्थी लोक उत्तरदायी आहेत. मंदिरांची भूमी लुटू शकणारे देशाचा किती पैसा लुटत असतील, हे लक्षात येते !
- पूर्वीच्या काळी राजे, श्रीमंत व्यक्ती मंदिरांना भूमी अर्पण करत होते, तर आता शासनकर्ते आणि लोक मंदिरांची भूमी बळकावत आहेत ! ही स्थिती पालटून मंदिरांचे आणि त्यांच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी भक्तांनी संघटित होऊन यास वैध मार्गाने विरोध केला पाहिजे !
चेन्नई (तमिळनाडू) : तमिळनाडू राज्यातील मंदिरांच्या २५ सहस्र ८६८ एकर भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या भूमीचे मूल्य १० सहस्र कोटी रुपये आहे. राज्यातील हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या नियंत्रणात असलेल्या मंदिरांच्या भूमीची नोंदणी ‘डिजिटल’ करण्याची योजना चालू केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. ही भूमी विविध लोकांनी अवैधरित्या हस्तांतरित केली आहे. आतापर्यंत ३८ सहस्र मंदिरे आणि मठ यांच्या भूमीची डिजिटल नोंदणी करण्यात आली आहे.
१. मार्च २०१९ मध्ये ‘ऑर्गनायजर’ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार कांचीपुरम् येथील तिरुपूरमधील प्राचीन मुरुगन मंदिराशी संबंधित असलेल्या ७६ एकर भूमीवर अतिक्रमण करून तेथे निवासासाठी इमारती उभारण्यात आल्या आहेत. या भूमीचे मूल्य ७५० कोटी रुपयांहून अधिक आहे.
२. जुलै मासामध्ये थिरुथोंडार्गल सबाई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ए. राधाकृष्णन् यांनी म्हटले होते की, राज्यातील मंदिरांच्या ७० टक्के भूमीवर अतिक्रमण करण्यात आलेेे आहे. यातील अधिकांश भूमी मंदिरांना दान म्हणून मिळाली आहे. आता यावर भू माफियांंनी अतिक्रमण केले आहे आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात