- उत्तरप्रदेशात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
- मशीद किंवा चर्च यांवर कोणी चुकूनही एखादा दगड भिरकावला, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी होते; मात्र भारतात प्रतिदिन कुठे ना कुठे हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होत असतांना प्रसारमाध्यमे याकडे आंधळे, बहिरे आणि मुके होऊन पहातात !
(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
देवरिया (उत्तरप्रदेश) : येथील मुसलमानबहुल मद्रापाली भारत राय भागात धर्मांधांनी काली मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे अतिरिक्त पोलीस दल तैनात केले. देवीची मूर्ती हत्तीवर बसलेली होती. धर्मांधांनी रात्रीच्या वेळी मूर्ती आणि हत्ती यांची तोडफोड केली. पोलिसांनी नंतर कारागिरांना बोलावून देवी आणि हत्ती यांच्या मूर्ती पूर्ववत् बसवून घेतल्या. (देवीची मूर्ती किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती भंगली, तर ती विसर्जित करून तेथे नवीन मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठापना केली पाहिजे. धर्मशास्त्र ज्ञात नसल्याने आणि त्याहून अधिक धर्मांधांवर कारवाई करण्यापासून घाबरत असल्याने पोलीस केवळ लोकांना शांत करण्यासाठी अशा प्रकाची डागडुजी करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आता पोलीस हिंदु आणि मुसलमान यांच्यात चर्चा करून तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. (हिंदूंनो, अशा शांतीचर्चांना भुलू नका ! मूर्तीभंजक धर्मांधांवर कारवाई होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात