Menu Close

अमरावती जिल्ह्यात गणेशोत्सव मंडळांचा हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

७०० हून अधिक गणेशभक्तांनी घेतला लाभ !

हिरूर पूर्णा गावात श्री. नीलेश टवलारे सांगत असलेली माहिती ऐकतांना धर्मप्रेमी
हिरूर पूर्णा येथे प्रदर्शनाचा विषय समजून घेतांना धर्मप्रेमी

अमरावती : चांदुर बाजार तालुक्यातील हिरूर पूर्णा या गावात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी ‘श्री गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव वेदमूर्ती श्रीकांत महाराज भुस्कडे या मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. त्यांनी त्यांच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेखही केला होता. महाराजांना समिती आणि सनातन संस्था यांच्याविषयी आदर असून त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी संस्थेची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. तेथील युवकांना समितीच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी क्रांतीकारकांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. स्वरक्षणाची प्रात्याक्षिकेही करून दाखवण्यात आली. उपस्थित युवकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

वेदमूर्ती श्रीकांत महाराज भुस्कडे यांच्या मंडळाचे वैशिष्ट्य !

वेदमूर्ती श्रीकांत महाराज भुस्कडे यांनी गावात आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा निर्माण केली असून गावात ‘एक गाव एक गणपति’ ही आदर्श संकल्पना आहे. यांच्या मंडळाच्या वतीने डीजे लावून मिरवणूक न काढता आदर्श पद्धतीने दिंडी काढली जाते. त्यांच्या शिष्यांकडून मंडळात प्रतिदिन अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. १० दिवस त्यांनी मंडळात केवळ व्याख्यान, भजन, सुंदरकांड, कीर्तन, गणेशोत्सवाचे  आणि गणपतीचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारे प्रवचन आदी धार्मिक विषयांवर कार्यक्रम ठेवले. आयोजनातील युवकही आदर्श वेशभूषा करून पूजन करतात.

वैशिष्ट्यपूर्ण

१. ५ ठिकाणांहून स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि २ ठिकाणांहून धर्मशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली.

२. दोन मंडळांनी फलक प्रदर्शन कार्यक्रमानंतरही मंडळात राहू देण्याची विनंती केली. त्यानुसार एका मंडळात सलग तीन दिवस हे प्रदर्शन लावण्यात होते. त्यानंतर त्यांनी स्वतःहून समितीच्या कार्यकर्त्यांकडे जमा केले.

३. सगळ्याच मंडळांमध्ये समितीच्या वतीने देण्यात आलेली माहिती पुष्कळ चांगली असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील शिराळा आणि जसापूर गावात तसेच शहरातील प्रसिद्ध नीळकंठ मंडळासह एकूण ११ मंडळांमध्ये ‘गणपति’ या विषयावर प्रवचन देण्यात आले. तसेच स्वरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्याक्षिक आणि क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *