नागपूर येथे ‘टाइम्स ऑफ इंडिया’कडून ‘पर्यावरणपूरक आणि आदर्श गणेशोत्सव’ या परिसंवादाचे आयोजन
नागपूर : शाडू मातीच्या मूर्तीने जलप्रदूषण होत नाही, असे राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केले असतांनाही काही पुरोगामी किंवा धर्माचा कुठल्याही प्रकारे अभ्यास न करणारे शाडू मातीला प्रोत्साहन न देता उलट गणेशमूर्ती हौदात विसर्जन करण्यासाठी पाठिंबा देतात. ‘इको फ्रेंडली’ च्या नावाखाली बनवण्यात येणारी कागदी लगद्याच्या मूर्ती पूर्णत: प्रदूषणकारी आहे. तसेच गोमयपासून बनवलेली मूर्तीही अशास्त्रीय आहे. या विषयी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम समितीच्या वतीने केले जात आहे. लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्यामागील उद्देश पूर्ण होतांना दिसत नाही. तो पूर्ण होण्याच्या दृष्टीने आदर्श गणेशोत्सवासंदर्भात जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला यांनी केले. गणेशोत्सवाच्या कालावधीत येथील इंग्रजी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वतीने त्यांच्या कार्यालयात ‘पर्यावरणपूरक आणि आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी श्री. आर्वेन्ला यांनी मांडलेल्या विचारांना सहमती दर्शवली.
वैशिष्ट्यपूर्ण
इंटेन्सिव्ह केअर फिजिशियन आणि हाफ डे वाईल्ड लीफर्स, मेंबर, मिडिया ग्रुपचे डॉ. अभिक घोष युवकांचे वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून प्रदूषण विरहित गणेशोत्सावासंदर्भात प्रबोधन करत आहेत. त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी ‘समितीने सहभागी व्हावे आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे’ अशी मागणी केली.