पुणे : हडपसर येथील शिवतांडव प्रतिष्ठान मंडळाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित शौर्य जागरण उपक्रम पार पडला. या उपक्रमासाठी धर्मप्रेमी श्री. हितेश अकुल यांनी पुढाकार घेऊन उपक्रमाचे आयोजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी मंडळासमोर स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवली, तसेच उपस्थितांकडून काही प्रकार करवूनही घेतले. या उपक्रमाचा १२५ हून अधिक गणेशभक्तांनी लाभ घेतला. गणेशभक्तांनी उत्स्फूर्तपणे भ्रमणभाषमध्ये प्रात्यक्षिकांचे चित्रीकरण केले. काहींनी ‘हे प्रशिक्षण आम्हालाही हवे आहे’, असे सांगून समितीच्या कार्यकर्त्यांकडे नावनोंदणीही केली.
प्रात्यक्षिके दाखवल्याविषयी शिवतांडव प्रतिष्ठान मंडळाकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.