नागपूर : येथे गणेशोत्सवाच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध धर्मजागृतीपर उपक्रम घेण्यात आले. शहरात विविध मंडळांमध्ये ‘साधनेचे महत्त्व’, ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ हे व्याख्यानांच्या माध्यमातून सांगण्यात आले. तसेच धर्मशिक्षण देणार्या फलकांचे प्रदर्शनही लावले होते.
वैशिष्ट्यपूर्ण : १. ‘गणेशोत्सवात काय असावे ?’ हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हा विषय आजच्या समाजापर्यंत जायलाच हवा, असे मत नंदनवन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. कपिल आवारी यांनी व्यक्त केले.
२. श्री. राहुल पेठे या जिज्ञासू व्यक्तीने व्याख्यान ऐकून स्वतःहून समितीचे कार्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
३. एका गणेशोत्सव मंडळात व्याख्यानाच्या वेळी पाऊस पडत असल्याने अडथळा येत होता. त्या वेळी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी लगेच जवळच्या मंदिरात नियोजन केले. या वेळी अनेक जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. तसेच आणखी काही वेळ विषय ऐकण्याची सिद्धता दर्शवली.