रामनाथ (अलिबाग) : येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदर्श गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
नागोठणे येथे ‘श्री गणेश उपासनेमागील अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन
नागोठणे (रायगड) : येथील शिवमंदिरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्री गणेशाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्र आणि ईश्वरी राज्याची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येथे अथर्वशीर्षाचे पठणही करण्यात आले.