हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नाची शक्यता
अनुमती न घेता चालू असणार्या प्रार्थनासभेला विरोध करणार्यांनाच पोलिसांकडून विरोध
सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) – येथील ‘व्हू गेस्ट हाऊस’मध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्यात येणार असल्याच्या माहितीवरून विश्व हिंदु परिषदने त्यास विरोध केला. या वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांचा पोलिसांसमवेत वादही झाला. या वेळी नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन ख्रिस्ती मिशनरींकडे प्रार्थनासभेची अनुमती नसल्याचे पाहून पोलिसांच्या साहाय्याने ही सभा बंद पाडली. (जो भाग तहसीलदारांनी केला, तो पोलिसांनी का केला नाही ? एरव्ही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कायर्र्क्रमांना अनुमती नाकारणारे पोलीस ख्रिस्ती मिशनरींच्या कार्यक्रमाला अनुमती आहे कि नाही, याची साधी विचारणा का करत नाहीत ? अनुमतीविना एखादा कार्यक्रम होत असेल, तर त्याकडे पोलीस पहात नाहीत का ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कारवाई झाली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. ख्रिस्ती मिशनरीच्या प्रार्थनासभेचे आयोजन करणारे अमर सिंह म्हणाले की, अन्य धर्मगुरू त्यांचे कार्यक्रम आयोजित करतात, तशीच ही आमची वार्षिक प्रार्थनासभा होती. येथे धर्मांतरचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. केवळ प्रवचन होणार होते. (यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. विहिंपचे प्रांत समन्वय प्रमुख शमशेर सिंह ठाकूर यांनी ‘येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर केले जाते’, असा आरोप केला.
३. या वेळी विहिंप आणि बजरंग दल यांनी प्रशासनाकडे ‘भविष्यात धर्मांतराच्या घटना होऊ नयेत; म्हणून मिशनरींच्या हालचालीवर लक्ष ठेवावे’, अशी मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून त्यांच्या दायित्वाचे पालन का करत नाही ?- संपादक, दैनिक सनातन प्रभात ) याशिवाय ‘जे धर्मांतरित होत आहेत, त्यांनी सरकारकडून त्यांना मिळणार्या सुविधा सोडून दिल्या पाहिजेत’, असेही विहिंप आणि बजरंग दल यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात