- पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे तथाकथित मुसलमानप्रेम उघड !
- काश्मीरमधील मुसलमानांविषयी पाक दाखवत असलेली आपुलकी हे केवळ ढोंग आहे, हेच इम्रान खान यांच्या उत्तरातून स्पष्ट होते ! भारतात राहून पाकशी एकनिष्ठ असणार्यांनी हे लक्षात ठेवावे !
इस्लामाबाद : चीनमधील उघूर मुसलमानांविषयी चीनसमवेत मी कोणतीही चर्चा केलेली नाही. मी काश्मीर आणि पाकिस्तान यांना भेडसावणार्या समस्यांमध्ये इतका व्यस्त आहे की, मला उघूर मुसलमानांशी चीन कसा वागत आहे, याची कोणतीही माहिती नाही. ते (उघूर मुसलमान) चीनमध्ये आहेत. मला तुम्ही येथील समस्यांचा सामना करू द्या, असे उत्तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनमधील उघूर मुसलमानांवर होत असलेल्या अत्याचारांविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिले. ‘पाकिस्तानला काश्मीरमधील मुसलमानांची चिंता आहे, तर चीनमध्ये उघूर मुसलमानांच्या प्रश्नावर चीनच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली आहे का ?’ असा प्रश्न ‘अल् जझीरा’ वृत्तवाहिनीने इम्रान खान यांच्या घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी विचारला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात