नंदुरबार : जगात चीननंतर भारताची लोकसंख्या सर्वाधिक असून लोकसंख्यावाढ भारतासमोरील सर्वांत मोठी समस्या बनली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील नैसर्गिक साधनसुविधा, आर्थिक स्थिती, रोजगार, अन्नधान्य, शिक्षण, शासकीय सोयीसुविधा, सुरक्षाव्यवस्था आदींवर प्रचंड ताण येत आहे. त्यात अहिंदूंना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. त्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. येथे १५ सप्टेंबर या दिवशी नेताजी सुभाष बाबू चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी आंध्रप्रदेश सरकारच्या वतीने हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेले धार्मिक आक्रमण रोखणे, पुरी (ओडिशा) येथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना अवैध ठरवून ती पाडण्याची अयोग्य कारवाई रोखावी अशा मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. दिलीप ढाकणे पाटील, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. सतिश बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, व्यायाम शाळा, मंडळे यांचे पदाधिकारी उपस्थित होते.