Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथील व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शन !

धर्माचरण केल्यानेच मनुष्य व्यसनापासून दूर राहून जीवनात आनंद अनुभवू शकतो ! – सौ. क्षिप्रा जुवेकर

जळगाव : व्यसनापासून दूर रहाण्यासाठी हिंदु धर्मात ‘आदर्श दिनचर्या’ कशी असायला हवी, याचे उत्तम वर्णन दिले आहे. आपण धर्मापासून लांब गेल्याने आणि विदेशी संस्कृतीनुसार आचरण केल्यानेच व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून लाखो तरुण आज व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. व्यसनापासून लांब रहायचे असेल, तर आपापल्या कुलदेवाचा नामजप करायला हवा. बहुसंख्य व्यसने ही पूर्वजांच्या त्रासामुळे जडतात. यासाठी नियमित ’श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करावा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले. या वेळी त्यांनी ’पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व’ याविषयी देेखील मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. ब्रह्मा अंकलेकर, सनातन संस्थेच्या सौ. अनिता पोळ, श्री. दिलीप पोळ उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्राचे संचालक श्री. नितीन विसपुते यांनी काही दिवसांपूर्वीच गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट दिली होती. आश्रमातील कार्य पाहून त्यांनी प्रत्येक मासाला व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन ठेवण्याचे निश्‍चित केले आहे. त्यांनी प्रत्येक रुग्णासाठी ’श्री गुरुदेव दत्त’ ही नामपट्टी विकत घेतली.

२. काही रुग्णांनी शंका विचारून आपल्या शंकाचे निरसन करून घेतले.

३. प्रतिदिन काही वेळ सामूहिक नामजप करणार, असेही उपस्थितांनी सांगितले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल (जळगाव) येथे तहसीलदारांना निवेदन !

यावल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार आर्.के. पवार यांना विविध विषयांवरील निवेदन देण्यात आले. यात आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेले धार्मिक आक्रमण रोखले जावे, देहली विश्‍वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास काळे फासणार्‍या अक्षय लकडाला अटक व्हावी आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षेच्या नावाखाली सरकारने तेथील प्राचीन मठ अन् मंदिरे यांना बेकायदा ठरवून ती पाडण्याची अयोग्य कारवाई रोखावी, आदी मागण्या करण्यात आल्या. यासह लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन करण्याच्या हेतूने कायदा करावा, तसेच देशभर समान नागरी कायदा लागू करावा या मागण्याही करण्यात आल्या.

या वेळी सर्वश्री धीरज भोळे, ब्रह्मा अंकलेकर, राहुल कोळी, खेमराज कराडे, गणेश माळी, अजय नेवे, विनोद कुंभार, कुलदीप पाटील, रोहित राजपूत, कोमल इंगळे, भास्कर वारके, कमलाकर जाधव, प्रशांत बारी, खापरु पाटील आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *