खारघर (नवी मुंबई) : स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि १९ मार्च या दिवणी गोरक्षण केले होते.
१. गोरक्षक आणि अधिवक्ता श्री. राजू गुप्ता यांनी नवी मुंबई गौरक्षक सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौशाळा अध्यक्ष श्री. अशोक शिवतेजजी, कोकण प्रांत बजरंग दलाचे श्री. उमेश गायकवाड, वर्धमान परिवाराचे श्री. रमेश पुरोहित, अधिवक्ता सौ. सिद्धविद्या, खारघर सेक्टर ६ येथील गोशाळेचे संचालक श्री. प्रतीक ननावरे, श्री. संदीप शर्मा, श्री. अमित शर्मा, पंचगव्य तज्ञ आणि गोसेवक डॉ. नीलेश तुपे, शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष श्री. वासुदेव घरत, पीपल फॉर अॅनिमल्सचे श्री. चेतन शर्मा, कळंबोलीचे गोसेवक आणि शिवसैनिक श्री. महेंद्र पवार, बजरंग दल-कळंबोलीचे श्री. सचिन झुझेराव आणि चेतन जोशी, गोरक्षक आणि शिवभक्त श्री. तुकाराम सूर्यवंशी आणि कपिल जमदाडे, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरचे साहायक वैज्ञानिक डॉ. नवनाथ बुधाजी, मोतीराम गोंधळी, गोशाळेत सेवा करणारे श्री. ज्ञानेश्वर, श्री. रामेश्वर आणि श्री. संतोष सूर्या, श्री. मोतीरामजी आदी गोरक्षकांचा सत्कार करण्यात आला.
२. या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद, शिवसेना, बजरंग दल, पठमेडा, वर्धमान परिवार, भारतीय गौवंश रक्षण संवर्धन परिषद, पतंजली योगपीठ, भारत स्वाभिमान, पीपल फॉर अॅनिमल्स, मुंबादेवी गौभक्त मंडळ, पंचगवया वैद्य, ऑरगॅनिक शॉप ओनर्स आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व संघटनांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात