Menu Close

आतंकवादी चंद्रावरून नाही, तर पाकिस्तानमधून येतात ! : युरोपियन युनियन

ब्रुसेल्स (बेल्जियम) : भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी घटनांची आपण नोंद घेतली पाहिजे. आतंकवादी चंद्रावरून येत नाहीत, तर भारताच्या शेजारी असणार्‍या पाकमधून येतात. अशा वेळी आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे, असे मत पोलंडचे नेते आणि युरोपियन युनियनचे सदस्य रिजार्ड जार्नेकी यांनी व्यक्त केले आहे. काश्मीरचा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकला युरोपियन युनियनने फटकारले आहे. काश्मीरच्या सूत्रावर युरोपियन युनियनमध्ये ११ वर्षांनंतर चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. त्यांनी आतंकवादाच्या सूत्रावरून पाकवर टीका केली.

ANI
✔@ANI

Ryszard Czarnecki, European Conservatives&Reformists Group,Poland: India is the greatest democracy of the world. We need to look at terrorist acts that took place in India,J&K.These terrorists didn’t land from moon.They were coming from neighboring country.We should support India

13.7K
3:46 AM – Sep 18, 2019
Twitter Ads info and privacy

4,876 people are talking about this

इटलीचे नेते आणि युनियनचे सदस्य फुलवियो मार्तुसिलो यांनी आरोप केला की, पाकिस्तान अणूबॉम्ब टाकण्याची धमकी देत आहे. आतंकवादी पाकिस्तानात कट रचतात आणि युरोपमध्ये आक्रमणे घडवून आणतात.

ANI
✔@ANI

Fulvio Martusciello,Group of European People’s Party (Christian Democrats), Italy: Pakistan has threatened to use nuclear arms. Pak is somewhere where terrorists have been able to plan bloody terrorist attacks in Europe without mentioning tremendous human rights violation in Pak

2,152
3:49 AM – Sep 18, 2019
Twitter Ads info and privacy

753 people are talking about this

काश्मीरच्या सूत्रावर भारत-पाक यांनी चर्चा करायला हवी आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करायला हवा.

काश्मीर हे भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय सूत्र ! – चीन

बीजिंग (चीन) : आम्ही काश्मीरप्रश्‍नाला भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय सूत्राच्या दृष्टीने पहातो. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देश मैत्रीपूर्ण आणि शांततेने हा प्रश्‍न सोडवतील, असे चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले. ‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात लवकरच अनौपचारिक बैठक होणार आहे. यात काश्मीरचा विषय नसेल’, असेही हुआ चुनयिंग यांनी सांगितले. यापूर्वी चीनने संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीरच्या प्रश्‍नावर अनौपचारिक आणि गोपनीय बैठक बोलावली होती; मात्र यातून काहीही साध्य झाले नव्हते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *