Menu Close

बांगलादेशमध्ये संतानंद ब्रह्मचारी यांना अटक

ढाका : बांगलादेशमधील शेरपूर सेवाश्रमाचे संतानंद ब्रह्मचारी यांना त्यांच्या एका शिष्यासह शेरपूर पोलिसांनी नुकतीच अटक केली. चंदन साहा नावाच्या एका व्यक्तीने अधिवक्ता चंदनकुमार पाल यांच्या साहाय्याने ब्रह्मचारी यांच्या विरोधात तक्रार केली होती. ‘ब्रह्मचारी यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर चंदन साहा यांच्या विरोधात खोटे वृत्त प्रसारित करून नाहक आरोप केले आहेत’, असे तक्रारीत म्हटले होते.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांनी शेरपूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी याविषयी चर्चा केली. या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे पू. (अधिवक्ता) घोष यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *