गोरखपूर (उत्तरप्रदेश) : काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पूनर्वसन करावे, रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
ख्रिस्ती चर्चमधील घोटाळे आणि अनैतिक कृत्ये लक्षात घेऊन देशभरातील सर्व चर्चचे सरकारीकरण करावे किंवा सर्व हिंदु मंदिरांचे सरकारीकरण रहित करावे, तसेच आंध्रप्रदेश सरकारने ख्रिस्ती पाद्री आणि मुसलमान इमाम अन् मौलवी यांना मतांसाठी मासिक वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तात्काळ रहित करावा, देशभरात काही दिवसांपासून ‘बळजोरीने ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडले’, अशा खोट्या तक्रारी करणार्या असामाजिक तत्त्वांच्या विरोधातही कारवाई करावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या वेळी सर्वश्री अधिवक्ता शेष नारायण पांडेय, श्री. लक्ष्मी चरण शुक्ला, श्री. प्रदीप कुमार सिंह, श्री. बालकृष्ण भट्ट, श्री. श्रवण कुमार पटेल आणि हिंदु जनजागृती समितीचे गोरखपूर समन्वयक श्री. प्रशांत वैती उपस्थित होते.