Menu Close

हिंदु जनजागृती समितीकडून ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची भेट

परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांना माहिती देताना श्री. प्रकाश मालोंडकर (डावीकडे)

राऊरकेला (ओडिशा) : हिंदु जनजागृती समितीचेे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘क्रियायोग इंटरनॅशनल’चे परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांची त्यांच्या बालीघाई येथील आश्रमात भेट घेतली. या वेळी श्री. मालोंडकर यांनी त्यांना हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक कार्याविषयी माहिती दिली. या वेळी स्वमामीजींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र अन् धर्म यांविषयीच्या कार्यासाठी आशीर्वाद दिले. ‘येत्या काही दिवसांत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट देईन’, असे स्वामीजी म्हणाले.

‘क्रिया योग इंटरनॅशनल’चे भारत, अमेरिका, युरोप आदी ठिकाणी अनेक आश्रम असून परमहंस स्वामी प्रज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनानुसार जगभरात सहस्रोंच्या संख्येने त्यांचे शिष्य साधना करत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *