पलीमरू, दक्षिण कन्नड (कर्नाटक) : हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लश्मी पै यांनी येथील श्री गणेशोत्सव समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व काय ? तसेच तो आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा ? यांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘लोकमान्य टिळकांनी हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण हे उद्देश समोर ठेवून गणेशोत्सवास प्रारंभ केला. आज मात्र तो उदात्त हेतू विस्मृतीत गेला आहे. या स्थितीवर हिंदूंना व्यापक स्तरावर धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.’’ याप्रसंगी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर एम्. सुवर्णा यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचा १५० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.