राऊरकेला (ओडिशा) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंडीदा (जिल्हा जगतसिंहपूर) येथे ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांच्या कार्यात धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समितीचे ओडिशा समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात अन् उपाययोजना’ यांविषयी माहिती दिली. या मार्गदर्शनाला अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पारादीप येथील सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. कुलमणी मोहंती यांनी केले. अशाच प्रकारचे मार्गदर्शन डॉ. मोहंती यांनी स्थापन केलेल्या येथील शाळेत पार पडले. या वेळी ६० हून अधिक जण उपस्थित होते.
क्षणचित्र : या कार्यक्रमाला उपस्थित असणार्या धर्मप्रेमींपैकी ८ ते १० युवक रात्री पुन्हा एकत्र आले. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी चर्चा केली, तसेच शंकानिरसन करून घेतले. या वेळी त्यांना हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक कार्याविषयी माहिती देणारी ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.