Menu Close

सुंदरगड (ओडिशा) जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्यास चांगला प्रतिसाद

प्रदर्शन पहातांना धर्माभिमानी हिंदू

राऊरकेला (ओडिशा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेमका (जिल्हा सुंदरगड), तसेच बरईगडा या गावांत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंघटन बैठकीस दोन्ही ठिकाणी १२५हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

१. बेमका आणि बरईगडा या दोन्ही ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ध्वनीचित्रफितींच्या माध्यमातून धर्म आणि राष्ट्र यांची सद्य:स्थिती, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाययोजना यांसंदर्भात मार्गदर्शन केले.

२. वरील दोन्ही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी पाक्षिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

३. हाथीवाडी येथील शिवमंदिरात शिव या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. शिवमंदिर देवस्थान समितीने महाशिवरात्री उत्सवात धर्मजागृतीविषयी ८ फ्लेक्स फलकांचे आयोजन करून मंदिरात कायमस्वरूपी धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावले.

४. या वेळी सनातनचे ग्रंंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा हाथीवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घेतला.

५. बेमका गांवातील हिंदूसंघटन बैठकीच्या आयोजनात हाथीवाडी येथील धर्मसत्संगात येणारे श्री. चामरा साहू, श्री. अंबर शंकर उपाख्य रिब्लू देव आदी धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

महाशिवरात्रीनिमित्त राऊरकेला, बिरमित्रपूर, हाथीवाडी आणि राजगंगपूर या भागात महाशिवरात्रीसंदर्भात आध्यात्मिक माहिती देणार्‍या २ सहस्र हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *