पंतप्रधान मोदी यांचा अमेरिकेतील भारतियांसाठीचा कार्यक्रम
- ‘हिंदुत्वनिष्ठ’ मोदी यांना धर्मांध केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही विरोध करतात, हे लक्षात घ्या !
- अमेरिकेतील सुरक्षायंत्रणा या प्रकरणात कारवाई करणार का ? कि त्यांना मोदी यांना विरोध झालेला हवाच आहे ?
न्यूयॉर्क (अमेरिका) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. तेथे ते भारतियांच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमावरून तेथील भारत आणि पाकिस्तान वंशीय नागरिकांमध्ये वाद चालू झाला आहे. येथील भारताच्या समर्थकांनी आरोप केला आहे की, या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी मशीद आणि इस्लामी सेंटर येथे मोठ्या संख्येने मुसलमान जात आहे आणि ते कार्यक्रम उधळण्याची योजना बनवत आहेत.
या संदर्भात भारतियांनी पोलीस, एफ्बीआय, यूएस् सिक्रेट सर्व्हिस आणि पारपत्र कार्यालय यांच्याकडे तक्रार केली आहे. सामाजिक माध्यमांतून भारत आणि पाक यांच्या समर्थकांकडून वादविवाद होत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात