युवा प्रतिष्ठानची अभिनंदनीय कृती !
जळगाव : येथून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रात अनंत चतुर्दशीच्या दिवशी असंख्य श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यावर दुसर्या दिवशी काठावर आलेल्या असंख्य श्री गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन येथील युवा प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले. (स्वयंप्रेरणेने धर्माचरणाची कृती करणार्या अशा धर्माभिमान्यांवर श्री गणेशाची कृपा होईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) विसर्जनाच्या दिवशी नदीला पूर आल्याने गणेशभक्तांनी नदीकाठावरच मूर्तीविसर्जन केले होते; त्यामुळे पूर ओसरल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असंख्य भग्न मूर्ती काठावर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. (भाविकांनी शाडूमातीपासून सिद्ध केलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात