उज्जैन (मध्यप्रदेश) : सनातनचे ग्रंथ ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील माधव सेवा न्यास समितीचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक शिक्षण सेवा समितीचे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. भालेराव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. भालेराव यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य समजून घेतले. सनातन-निर्मित ग्रंथ पाहिल्यावर ते म्हणाले हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची कुठेच व्यवस्था नाही. काळाची आवश्यकता ओळखून सनातन कार्य करत आहे. सनातनच्या ग्रंथांद्वारे हिंदूंना सरळ आणि सोप्या भाषेत धर्मशिक्षण दिले जात आहे, हे कौतुकास्पद आहे. सनातन संस्थेला कधीही सहकार्याची आवश्यकता भासल्यास मी करीन. या वेळी त्यांनी सिंहस्थ कुंभपर्वात लावण्यात येणार्या प्रदर्शनास सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
क्षणचित्र
श्री. गिरीश भालेराव यांनी त्यांच्या शाळेसाठी सनातनची लहान मुलांची ग्रंथमालिका घेण्याची सिद्धता दाखवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात