Menu Close

तुम्ही पुष्कळ सोसले असून आता नवा काश्मीर घडवूया ! – मोदी यांचे काश्मिरी हिंदूंना आश्‍वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याला प्रारंभ

विस्थापित हिंदू नव्या काश्मीरमध्ये परत त्यांच्या मूळ घरी परततील, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

ह्यूस्टन (अमेरिका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ सप्टेंबरच्या रात्री अमेरिकेच्या ७ दिवसांच्या दौर्‍यासाठी ह्यूस्टन येथे पोचले. त्या वेळी अमेरिकेच्या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे संचालक क्रिस्टोफर ओल्सन अन् इतर पदाधिकारी यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

पंतप्रधान मोदी यांनी येथे पोचल्यावर काश्मिरी हिंदू, शीख आणि बोहरा मुसलमान या समाजातील लोकांच्या भेटी घेतल्या. या वेळी कलम ३७० हटवल्यावरून काश्मिरी हिंदूंनी भावुक होऊन मोदी यांचे आभार मानले. या वेळी काश्मिरी हिंदूंनी ‘नमस्ते शारदे देवी’ हा श्‍लोकही म्हटला. ‘तुम्ही पुष्कळ काही सोसले आहे; मात्र आता जग पालटत आहे. आता आपल्याला एकत्र येऊन पुढे जायचे आहे आणि नवीन काश्मीर घडवायचा आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी त्यांना सांगितले. पंतप्रधानांनी या भेटीचा एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केला आहे आणि ‘ह्यूस्टनमध्ये काश्मिरी पंडितांशी झालेली विशेष भेट’ असे लिहिले आहे.

काश्मिरी हिंदूकडून पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतांना हाताचे चुंबन घेतले !

काश्मिरी हिंदूंच्या भेटीच्या वेळी सुरिंदर कौल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हाताचे चुंबन घेत म्हटले की, ‘कलम ३७० रहित करण्याच्या तुमच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि ७ लाख काश्मिरी हिंदू तुम्हाला धन्यवाद देत आहोत.

भारताला प्रतिवर्षी ५० लाख टन नैसर्गिक वायू देण्याचा अमेरिकी ऊर्जा आस्थापनांसमवेत करार

पंतप्रधान मोदी हे ह्यूस्टनमध्ये ऊर्जा आस्थापनांच्या १४ मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमवेत आयोजित बैठकीला उपस्थित राहिले. ऊर्जा क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात सहयोग वाढवण्याच्या उद्देशाने ही बैठक पार पडली.

या वेळी भारतीय पेट्रोलियम आस्थापन ‘पेट्रोनेट’ने अमेरिकेच्या नैसर्गिक वायू (एल्.एन्.जी.) आस्थापन ‘टेलूरियन’कडून प्रतिवर्षी ५० लाख टन एल्.एन्.जी. आयात करण्याचा करार केला. समुद्रमार्गाद्वारे इंधनाची वाहतूक करणारे मोठ्या नौकांद्वारे द्रवस्वरूपात हा वायू भारतात आणण्यात येणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *