-
८०० किलो गोमांस जप्त
-
पाच जणांना अटक
संगमनेर – गुरुवारी मोगलपुरा येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ८०० किलो गोमांस जप्त केले असून, पाचजणांना अटक केली. मोहंमद इस्माईल कुरेशी, शाहिद इस्माईल कुरेशी, मतीन बशीर कुरेशी, जफार गुलफान कुरेशी, उमर शकुर कुरेशी (सर्व रा. मोगलपुरा, संगमनेर) अशी अटक केलेल्या धर्मांधाची नावे आहेत.
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जनावरांची कत्तल सुरू होती. मोगलपुर्यातील कत्तलखान्यांवर पोलिसांनी पहिल्यांदाच कारवाई केली. या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब झाले. संगमनेर शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना मोगलपुर्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सहकार्यांसह आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोगलपुरा परिसरात छापा टाकला. यावेळी अरुंद गल्लीबोळांच्या या परिसरातील एका पडक्या वाड्यात जनावरांची कत्तल सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस आल्याचे पाहताच या वाड्यात कत्तल करणारे आरोपी तेथून पसार होण्यात यशस्वी झाले. यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा याच भागात सुरू असलेल्या मांसविक्रीच्या दुकानांकडे वळविला.
पाच दुकानांमध्ये गोवंशाचे मांस विकले जात असल्याचे पोलिसांना आढळल्याने त्या दुकानांच्या चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका बंदिस्त अवस्थेतील कत्तलखान्यात जनावरे कोंडून ठेवली जात असल्याचेही पोलिसांच्या यावेळी निदर्शनास आले. पोलिसांनी कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारेही हस्तगत केली.
संगमनेर शहर पोलिसांनी तब्बल बावीस वेळा भारतनगर, कुरेशी मोहल्ला, मदिनानगर, कोल्हेवाडी रोड या परिसरातील कत्तलखान्यांवर छापे घातले होते. मात्र, मोगलपुर्यातील कत्तलखान्यांकडे दरवेळी दुर्लक्ष केले गेल्याने कसायांमध्येच दोन गट पडले होते. यातूनच पोलिसांवरही आरोप झाले होते. या परिसरातील कत्तलखान्यांबाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, पोलिसांनी अखेर आज या परिसरातील कत्तलखान्यांबाबत नेमकी माहिती मिळवित सकाळीच छापा टाकल्याने कत्तलखाने बंद असल्याचे दावे फोल ठरले आहेत.
यावेळी पोलिसांनी सांगितले की, आरोपी पसार झाले असले तरी लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येणार आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, त्यामुळे जो कायद्याचा भंग करील त्याच्यावर कारवाई होणार आहे. संगमनेर शहरात गोवंशाची कत्तल पूर्णत: थांबेपर्यंत अशा कारवाया सुरूच राहणार आहेत, असे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी सांगितले
स्त्रोत : सामना