काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचे विखारी विधान
हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. सनातन वैदिक धर्मानुसार जेव्हा आचरण व्हायचे, तेव्हा प्राचीन काळी देश प्रगतीपथावर होता. हिंदुबहुल देशात हिंदुत्वालाच देशविघातक ठरवणे, हा थरूर यांचा हिंदुद्वेषच आहे.
पुणे : आपल्या देशात गेल्या काही मासांपासून झुंडशाहीची (मॉब लिंचिंगची) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या ५ वर्षांत देशभरातील अनेक भागांत ‘जय श्रीराम’ न म्हणणार्या व्यक्तींच्या अमानुषपणे हत्या करण्यात आल्या आहेत. (यांतील बर्याच घटना असत्य असल्याचेही पोलिसांच्या अन्वेषणात पुढे आले होते. त्याविषयी थरूर का बोलत नाहीत ? काँग्रेसच्या कार्यकाळात १९९० च्या दशकात जिहादी आतंकवादामुळे काश्मीरमधून हिंदूंचे शिरकाण झाले. हीच देशातील सर्वांत मोठी मॉब लिंचिंगची घटना होती; मात्र त्याविषयी शशी थरूर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हा हिंदु धर्म आणि प्रभु श्रीराम यांचा अपमानच आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही संकल्पना देशाला घातक आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी केली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस समिती आणि ‘ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस’ यांच्या वतीने ‘राष्ट्र निर्मितीमध्ये व्यावसायिकांचा सहभाग’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. (‘झुंडशाहीच्या कथित घटनांमुळे प्रभु श्रीरामाचा अपमान होतो’, असे थरूर म्हणतात. मग ‘काँग्रेस जेव्हा श्रीरामाला काल्पनिक पात्र ठरवून सेतुसमुद्रम् प्रकल्पाअंतर्गत रामसेतू तोडायला निघाली होती’, ती काय श्रीरामाची पूजा होती ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘३७० कलम रहित केल्याचे समर्थन करावे कि नाही’, या बुचकळ्यात पडलेले शशी थरूर
‘३७० कलमाचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला आल्यावर आम्ही समर्थन करू; पण ते ज्या पद्धतीने हटवले, त्याविषयी आम्ही सरकारला प्रश्न विचारणार. भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात, तेव्हा त्यांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे. विदेशात त्यांचा झालेला अपमान सहन करणार नाही; मात्र ते जेव्हा देशात येतील, तेव्हा ‘तुम्ही देशासाठी काय केले’, याचा जाब विचारू’, असेही शशी थरूर म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात