Menu Close

३७० कलम हटवणारे केंद्र सरकार देशाला हिंदु राष्ट्रही बनवू शकते : परिसंवादातील मान्यवरांचा विश्‍वास

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आग्रा येथे ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’

डावीकडून कु. कृतिका खत्री, श्री. तरुण सिंह, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. मनीष शर्मा आणि श्री. अभय वर्तक

आग्रा : जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून विद्यमान केंद्र सरकारने मोठे धैर्य दाखवले आहे. असे राष्ट्रवादी सरकार येणार्‍या काळात घटनेच्या माध्यमातून देशाला ‘हिंदु राष्ट्र’ही करू शकते, असा विश्‍वास येथील ‘हिंदु राष्ट्र परिसंवादा’साठी एकत्र आलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्यक्त केला. या परिसंवादाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

परिसंवादात उपस्थित धर्माभिमानी

हिंदु समाजाला त्याच्या स्वसामर्थ्याची जाणीव करून देणे आणि संघटितपणे हिंदु राष्ट्र स्थापनेची पुढील दिशा निश्‍चित करणे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कमलानगरमध्ये ‘हिंदु राष्ट्र परिसंवादा’चे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये लोकसंख्येचा विस्फोट, लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आवश्यकता, मंदिर संस्कृती रक्षणाचे प्रयत्न, आग्र्यामधील बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांची समस्या, यमुना नदी-संस्कृतीचे रक्षण आदी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिंदूंच्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. या परिसंवादामध्येे ‘रिव्हर कनेक्ट अभियान’चे पर्यावरणवादी डॉ. देवाशीष भट्टाचार्य, भारत स्वाभिमानचे अधिवक्ता देवेंद्र सिंह ढाकरे, हिंदु युवा वाहिनीचे अधिवक्ता पीयूष शरण आणि श्री. तरुण सिंह, ‘सेव्ह युवर फ्युचर’ चे श्री. मनीष शर्मा, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, सनातनच्या देहली राज्य प्रवक्त्या कु. कृतिका खत्री, हिंदु जनजागृती समितीचे पंजाब आणि हरियाणा राज्य समन्वयक कार्तिक साळुंके आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *