भोर – येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती. (यावरून जन्महिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच सिद्ध होते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही गोष्ट हिंदु जनजागृती समितीचे प्रा. विठ्ठल जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी त्या सर्व देवता चित्रांच्या चौकटी एकत्र करून त्यांचे अग्निविसर्जन केले आणि देवतांची होणारी विटंबना रोखली. (धर्महानी रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे समितीचे प्रा. विठ्ठल जाधव हेच हिंदु धर्माची शक्ती आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सदर मंदिराविषयी घाटाच्या पायथ्याला असलेल्या गावातील नागरिकांकडे श्री. जाधव यांनी चौकशी केली. त्या वेळी कळले की, ते मंदिर कोणत्याही देवतेचे नसून घाटाचे काम चालू असतांना एक कामगार मरण पावला होता.
त्यांच्या स्मरणार्थ त्या कामगाराचे मंदिर बांधले आहे, अशी धक्कादायक माहिती मिळाली. अनेक हिंदू भाविक ते मंदिर देवाचे आहे, असे समजून तेथे दर्शनाला जातात. (यावरून देव आणि धर्म यांविषयी जन्महिंदूंचे असलेले अज्ञानच उघड होते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात