Menu Close

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) आणि पेद्दापल्ली (तेलंगण) येथे विविध मागण्यांसाठी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’

समान नागरी कायदा लागू करावा ! – हिंदु धर्माभिमानी

आंदोलन करतांना हिंदुु धर्माभिमानी

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) : केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी, देहली विश्‍वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीची विटंबना करणार्‍या अक्षय लाकडाला अटक करावी, तसेच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षेच्या नावाखाली तेथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना बेकायदा ठरवून ती पाडण्याची राज्य सरकारची कारवाई थांबवावी, या मागण्यांसाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम् आणि तेलंगणातील पेद्दापल्ली येथे १५ सप्टेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या वेळी विशाखापट्टणम् येथे भाजप, शिवशक्ती, श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते, तर पेद्दापल्ली येथे भाजयुमो, हिंदु युवा सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते अन् हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *